Take a fresh look at your lifestyle.

उन्हाळ्यात वारंवार पाणी पिऊनही तहान भागत नसल्यास करा ‘हे’ घरगुती उपाय

महाअपडेट टीम, 29 एप्रिल 2021:- तहान ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी प्रत्येक प्राण्यांना जाणवते, परंतु उन्हाळ्याच्या दिवसांत, बाह्य तापमानाबरोबरच शरीराच्या आत सुद्धा तापमान वाढत असते. अशा परिस्थितीत शरीराला जास्त पाण्याची आवश्यकता असते जेणेकरून तापमान संतुलित राहील. परंतु जेव्हा सतत पाणी पिऊनही आपली तहान भागत नाही, तेव्हा हे घरगुती उपाय करा.

Advertisement

जेव्हा सतत पाणी पिऊनही आपली तहान भागत नसेल तर पाण्यात मध घालून चांगल्या गुळण्या करा किंवा एक-दोन लवंगा तोंडात ठेवा आणि ते चोखत रहा. यामुळे तुम्हाला उन्हाळ्यात सतत पाणी पिऊनही तहान लागणार नाही.

Advertisement

सतत पाणी पिऊनही आपली तहान भागत नसेल तर त्यावर चांगला उपाय म्हणजे जायफळ. जायफळामुळे आपल्याला सारखी सारखी तहान लागनार नाही. यासाठी जायफळाचा एक छोटा तुकडा तोंडात ठेवा आणि तो चोखत रहा, तुम्हाला सतत तहान लागणार नाही.

Advertisement

गायीच्या दुधापासून बनविलेले दही 125 ग्रॅम, साखर 60 ग्रॅम, तूप 5 ग्रॅम, मध 3 ग्रॅम आणि मिरपूड 5 ग्रॅम, वेलची पूड इत्यादी सामग्री घेऊन ते दहीमध्ये चांगले मिक्स करा, आणि स्टीलच्या भांड्यात ठेवा, त्यातून थोडेसे दही खाल्ल्यास आपल्याला सतत तहान लागत नाही.

Advertisement

तांदळाच्या पिठामध्ये मध मिसळून प्यायल्यानेही आपल्याला सतत तहान लागत नाही.

Advertisement

सुपारी खाल्ल्यानेही आपल्याला सतत तहान लागत नाही. तसेच सुपारीचे पान खाल्ल्याने तोंड व घसा कोरडा राहत नाही.

Advertisement

दहीमध्ये गूळ खाल्ल्यानेही आपल्याला सतत तहान लागत नाही. हा देखील यावर एक चांगला घरगुती उपाय आहे, यामुळे जेवल्यानंतर तीव्र तहानही शांत होण्यास मदत होते.

Advertisement

याशिवाय टरबूज हा एक उत्तम आणि चवदार पर्याय आहे, जो भूक तसेच तहानही भागवितो. टरबूजाचे सेवन केल्याने आपले पोट भरते. जास्त भूक आणि तहान लागत नाही. टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. हे फळ आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Advertisement

 

Advertisement
Advertisement