Take a fresh look at your lifestyle.

Coronavirus In India Live Updates : बापरे ! कोरोनाची त्सुनामी, गेल्या 24 तासांत 3 हजाराहून अधिक मृत्यू, तर 3 लाख 62 हजार रुग्ण आढळले !

महाअपडेट टीम, 28 एप्रिल 2021 :- देशातील कोरोना रुग्णसंख्येत किंचित घट झाल्यानंतर गेल्या 24 तासांत तीव्र वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 3 लाख 62 हजार 787 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याने देशात कोरोनाचा कहर वाढत आहे. तर मृत्यूच्या आकड्याने आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहे.

Advertisement

गेल्या 24 तासात 3 हजार 285 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळपर्यंत 3 लाख 23 हजार रुग्णांची नोंद करण्यात आले होती परंतु मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत हा आकडा 3 लाख 62 हजारांच्या पुढे ढकलला आहे. या परिस्थितीत कोरोनाने आत्तापर्यंतचे जगभरातील सर्व विक्रम मोडीत काढले आहे.

Advertisement

देशात आत्तापर्यंत संसर्ग झालेल्यांची संख्या वाढून 1,79,88,637 वर पोहोचली आहे, तर राष्ट्रीय स्थरावर बरा होण्याचा दर घटून 82.54 टक्के झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या2,01,165 वर पोहोचली आहे.

Advertisement

उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्याही वेगाने वाढत आहे. ही संख्या वाढून 29,72,106 झाली आहे, जी संक्रमित एकूण लोकांपैकी 16.34 टक्के आहे. राष्ट्रीय स्थरावर कोविड -19 मधील बरे होण्याचा दर हा 82.54 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. संसर्गातून बरे होणार्‍या लोकांची संख्या वाढून 1,48,07,704 झाली आहे.

Advertisement

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू :- गेल्या 24 तासांत 3 हजार 285 मृत्यूंपैकी महाराष्ट्रातील 895, दिल्लीत 381, उत्तर प्रदेशात 264, छत्तीसगडमध्ये 246, कर्नाटकमधील 180, गुजरातमधील 170 आणि झारखंडमधील 131 रुग्णांचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, देशात कोविड -19 च्या एकूण रुग्णांपैकी एका दिवसात 69.1 टक्के महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह १० राज्यांमधील आहेत.

Advertisement
Advertisement