Take a fresh look at your lifestyle.

दिलासादायक चित्र : राज्यातील रुग्णसंख्येत झालीये ‘इतकी’ घट, एकाच दिवसात लसीकरणातही सर्व विक्रम मोडले !

महाअपडेट टीम, 27 एप्रिल 2021 :- देशाच्या विविध भागांत रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असताना या तुलनेत महाराष्ट्रात मात्र दिलासादायक चित्र आहे. मुंबईसह राज्यात रुग्णसंख्या घटली आहे. सोमवारी मुंबईतील रुग्णसंख्या 3876 वर घसरली आहे. रविवारी ही रुग्णसंख्या 5542 होती. तसेच राज्यात 60 हजारांवर पोहोचलेली रुग्णसंख्या 48,700 पर्यंत खाली आली आहे. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे. राज्यभरात मागील सहा दिवसांत तब्बल 4 लाख 42 हजार 466 रुग्ण कोरोनावर मात क रून घरी परतले आहेत.

Advertisement

देशभरात कोरोनाने कहर केला असून मुंबईसह राज्यभरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती. मागील काही दिवसांपासून रोज मोठ्या फरकाने रुग्णसंख्या वाढल्याने राज्यातील रुग्णसंख्या 60 हजारांवर पोहोचली होती.

Advertisement

मुंबईतही दररोज आठ ते साडेआठ हजार रुग्णांची नोंद होत होती. राज्यभरातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे शासकीय यंत्रणेवरही ताण आला. खाटा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदी सुविधाही अपुऱ्या पडू लागल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले.

Advertisement

त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू क रून नियमांची प्रभावी अंमलबजावणी केली. याचा फायदा होऊन रुग्णसंख्या घटू लागली. मुंबईत तीन-चार दिवसांपूर्वी साडेसात हजारांवर असलेली रुग्णसंख्या जवळपास निम्म्याने घटली आहे. तसेच मागील सहा दिवसांत तब्बल 4 लाख 42 हजार 466 रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे.

Advertisement

तर मुंबईत सोमवारी 9 हजार 150 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. नवीन आढळलेल्या रुग्णांइतकीच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या असल्याने रुग्णसेवेवरील ताण कमी झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Advertisement

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद सोमवारी केली असून सायंकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. सोमवारच्या लसीकरणाच्या अंतिम आकडेवारीत वाढ होऊ शकते. ३ एप्रिल रोजी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता.

Advertisement
Advertisement