Take a fresh look at your lifestyle.

चार वर्षे प्रेम करूनही प्रेयसीने ‘ब्रेकअप’ केलं, नात्यातील तरुणाशी साक्षगंधही केला, विरहग्रस्त प्रियकराने केले असे काही की…

महाअपडेट टीम, 26 एप्रिल 2021 :- चार वर्षे प्रेम केल्यानंतर कुटुंबीयांच्या विरोधामुळे प्रेयसीने प्रियकराशी ‘ब्रेकअप’ केले. त्यानंतर नात्यातीलच एका तरुणाशी साक्षगंध केले. मात्र, विरह सहन न झालेल्या प्रियकराने तिच्या होणाऱ्या पतीला सोबत काढलेले फोटो पाठवून लग्न मोडण्याची धमकी दिली. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला.

Advertisement

नितीन इंगळे (२३, रा.नंदनवन) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. आरोपी नितीनचे वस्तीतील २३ वर्षीय तरुणीशी चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. हा प्रकार तरुणीच्या घरच्यांना माहीत होता. परंतु, तो त्यांना पसंत नव्हता. इकडे घरच्यांच्या विरोधाला झुगारून दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

Advertisement

दरम्यान, आईवडिलांनी आत्महत्येची धमकी दिली. तरुणीने नात्यातीलच एका तरुणाशी लग्न करण्याचे ठरविले. त्यासाठी तिने नितीनसोबतचे नाते तोडले. दोघांचा साक्षगंध सोहळाही झाला. काही दिवसांवर लग्न असल्याने लग्नाच्या तयारी सुरू झाली.

Advertisement

प्रेयसीने प्रेम करून धोका दिल्याने नितीनला विरह असह्य झाला. त्याने वारंवार कॉल करून धमकी देणे सुरू केले. भेटायला येण्यासाठी दबाव टाकला. तिने भेटायला नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने तिच्या सोबतचे विविध प्रसंगाचे फोटो भावी वराला पाठविले.

Advertisement

22 एप्रिलला पाठलाग करून तिला लग्नासाठी आरोपीने दबाव टाकला. तरुणीने हा सर्व प्रकार आईवडिलांना सांगितला. तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपी नितीनविरोधात गुन्हा दाखल केला.

Advertisement
Advertisement