Take a fresh look at your lifestyle.

काळजाचा ठोका चुकवणारा इशारा : मे महिन्यात रोज कोरोनामुळे 5,000 हून अधिक लोकांचा मृत्यू होईल ?

महाअपडेट टीम, 24 एप्रिल 2021 :- देशात कोरोना विषाणूचा कहर कायम असून दररोज तीन लाखाहून अधिक रुग्ण आढळत आहे. कोरोनामुळे दररोज मृत्यूची संख्या अडीच हजारांच्या पुढे गेली आहे. रुग्णालयांमध्ये बेडांची मोठी कमतरता भासत असताना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळेही परिस्थिती त्रस्त आहे.

Advertisement

दरम्यान, अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाने काळजाचा ठोका चुकवणारा इशारा दिला आहे. मे महिन्याच्या मध्यावधीत देशात 5 हजाराहून अधिक मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच रुग्णसंख्या वाढून रोज आठ लाखांच्या पुढे जाऊ शकते.

Advertisement

इन्स्टिट्यूटने चालू वर्षात भारतात करोना मृत्यूसंख्या शिखरावर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 10 मे रोजी भारतात 5 हजार 600 जणांचा करोनामुळे मृत्यूची होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Advertisement

12 एप्रिल ते 1 ऑगस्ट या कालावधीत देशात 3 लाख 29 हजार जणांचा करोनामुळे मृत्यू होऊ शकतो. तसेच जुलै अखेरीपर्यंत एकूण 6 लाख 65 हजार मृत्यू होऊ शकतात, असंही इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स एण्ड इव्हॅल्युशनने अभ्यासात म्हटलं आहे.

Advertisement
Advertisement