Take a fresh look at your lifestyle.

Coronavirus In Maharashtra Live Updates : दिलासादायक बातमी ! गेल्या २४ तासांत ७४ हजार ४५ रुग्ण बरे झाले, पण…

महाअपडेट टीम, 24 एप्रिल 2021 :- राज्यावरील कोरोना संकट दिवसेंदिवस गडद होत असताना शुक्रवारी दिलादायक चित्र समोर आले आहे. शुक्रवारी दिवसभरात नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांचा आकडा मोठा होता.

Advertisement

मागील तासांत 74 हजार 45 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर 66 हजार 836 नवे रुग्ण आढळले आहेत. तर विक्रमी 773 रुग्णांच्या मृत्यूची नोंदही झाली आहे. नव्या रुग्णांमुळे राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा हा 41,61,676 वर पोहोचला आहे.

Advertisement

आजच्या नोंदीनुसार राज्यात 6 लाख 91 हजार 851 एक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक 1 लाख 16 हजार 602 रुग्ण पुणे जिल्ह्यात असून त्यापाठोपाठ मुंबई पालिका क्षेत्रात 81 हजार 174 इतके रुग्ण आहेत.

Advertisement

नागपूरमधील करोनाची स्थितीही भीषण असून सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यात 80 हजार 862 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर ठाणे जिल्ह्यात 77 हजार 793 इतके एक्टिव्ह रुग्ण असून नाशिक जिल्ह्यात हा आकडा 43 हजार 848 वर पोहचला आहे.

Advertisement

मुंबईत आज 7 हजार 199 नवीन करोना बाधितांची नोंद झाली. पुणे पालिका क्षेत्रात 4 हजार 536 रुग्ण वाढले तर नागपूर पालिका क्षेत्रात 5 हजार 426 रुग्णांची भर पडली. या तिन्ही शहरांतील आरोग्य व्यवस्थेवर सध्या प्रचंड ताण आला आहे.

Advertisement
Advertisement