Take a fresh look at your lifestyle.

100 कोटी वसुली प्रकरण : अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल, पीपीई किट घालून छापेमारी सुरु !

महाअपडेट टीम, 24 एप्रिल 2021 :- महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधात एफआयआर नोंदविला आहे. याप्रकरणी सीबीआय या वेगवेगळ्या ठिकाणी तपास करत आहे, असं ANI नं म्हटलं आहे.

Advertisement

अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी 100 कोटी खंडणीचा आरोप केला होता. या आरोपानंतर अनिल देशमुख यांना आपली खुर्ची गमवावी लागली होती. त्यामुळे हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने त्यांच्याविरोधात चौकशी सुरू केली आहे.

Advertisement

अलीकडेच सीबीआयने रविवारी अनिल देशमुख यांची चौकशी करण्यापूर्वी केंद्रीय एजन्सीने अनिल देशमुख यांच्या दोन वैयक्तिक सहाय्यकांची चौकशी केली. दुसरीकडे एनआयएच्या ताब्यात मुंबई पोलिसांचे निलंबित सचिन वाझे यांच्या दोन वाहनचालकांचीही चौकशी करण्यात आली होती.

Advertisement

अनिल देशमुख यांचं FIR मध्ये आरोपी म्हणून नाव आहे. त्याचयोबत इतर अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सीबीआय दिल्लीची टीम कोर्टाच्या आदेशानंतर मुंबईत चौकशी करत होती. आज सकाळपासून याप्रकरणी चौकशीसाठी विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. नागपूर आणि मुंबईमध्ये सीबीआयने पीपीई किट घालून हे छापे टाकले आहेत.

Advertisement
Advertisement