Take a fresh look at your lifestyle.

Coronavirus In maharashtra Live Updates : दिलासादायक बातमी ! गेल्या 24 तासांत विक्रमी 62,298 रुग्ण बरे झाले, तर तर 568 लोकांनी जीव गमावला !

महाअपडेट टीम, 23 एप्रिल 2021 :- महाराष्ट्रात गुरुवारी दिवसभरात 67,013 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 40 लाख 94 हजार 840 इतकी झाली आहे. तर 568 बळींमुळे मृतांचा आकडा 62,479 वर पोहोचला.

Advertisement

दिवसभरात 62,298 रुग्ण बरे झाले. एकाच दिवशी एवढे रुग्ण बरे होण्याचा हा राज्यातील आतापर्यंतचा सर्वात विक्रमी उच्चांक आहे. कोरोना संकटात राज्यासाठी दिलासादायक ठरणाऱ्या या संख्येमुळे कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 33 लाख 30 हजार 747 इतकी झाली.

Advertisement

राज्यात आज नवीन बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी राहिल्याने एक्टिव्ह रुग्णांचा आकडा 7 लाखांच्या आतच राहिला. सध्या राज्यात 6 लाख 99 हजार 858 एक्टिव्ह रुग्ण आहेत.

Advertisement

त्यात सर्वाधिक 1 लाख 17 हजार 337 रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यानंतर मुंबई पालिका क्षेत्रात 82 हजार 616 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर नागपूर जिल्ह्यात 80 हजार 924 आणि ठाणे जिल्ह्यात 80 हजार 616 एक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत आज 7 हजार 367 नवीन रुग्णांची भर पडली तर पुणे पालिका क्षेत्रात 4 हजार 657 नवे रुग्ण आढळले.

Advertisement

राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.34 टक्के आहे. तर राज्यातील मृत्यूदर 1.53 टक्के आहे. सध्या राज्यात 39,71,917 लोक होम क्वारंटाइनमध्ये असून 29,014 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आजपर्यंत 2,48,95,986 नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Advertisement
Advertisement