Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक ! प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीचा काढला काटा

महाअपडेट टीम, 22 एप्रिल 2021 :- रेल्वे रुळावर आढळलेल्या व्यक्तीचा पत्नीनेच खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा काटा काढला असून, पोलिसांनी दोघांनाही अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. झोपलेल्या अवस्थेत बेशुद्ध केल्यानंतर हातपाय बांधून जवळच्या रेल्वे रुळावर टाकून त्याचा खून करण्यात आल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.

Advertisement

शेगाव तालुक्यातील नागझरी येथे पंक्चर दुरुस्तीचे काम करणाऱ्या रामधन दांदळे याचा मृतदेह नारळाच्या दोरीने हातपाय बांधून रुळावर आणून टाकल्याचे दोन दिवसांपूर्वी उघडकीस आले होते. मृत रामधनची पत्नी रेखा दांदळे हिनेच आपला पती रात्रीपासून गायब असल्याची तक्रार पोलिसांत केली होती. हा घातपात असल्याने बुलढाणा येथून श्वानपथक बोलावण्यात आले. या श्वानाने पोलिसांना तपासाची दिशा दिली आणि फिर्यादी पत्नीच आरोपी निघाली.

Advertisement

रेखा व तिचा प्रियकर संतोष साठे यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला. यावेळी दोघांनीही खून केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात आणखी आरोपी सहभागी आहेत काय या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

Advertisement

एकीकडे रामधन दांदळे याचा खून झाला, तर दुसरीकडे त्याची भावजय बारा दिवसांपासून बेपत्ता आहे. महिला बेपत्ता होण्यामागे या घटनेतील कारण काय आहे, याचाही तपास पोलीस करत आहेत.

Advertisement

 

Advertisement
Advertisement