Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक ! कोरोनाच्या भीतीने विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

महाअपडेट टीम, 22 एप्रिल 2021 :- दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव मानवी जीवनावर मोठा परिणाम करत आहे. सोलापूर शहरात असाच एक धक्कादायक परिणाम दिसून आला.

Advertisement

कोरोनाच्या भीतीने विजापूर रोडवरील मंत्री चंडक रेसिडेन्सी येथील राहत्या घरी एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला.

Advertisement

रेखाराणी अमर मुंडे (३७) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. रेखाराणी यांचे पती अमर मुंडे यांना कोरोना झाला होता. खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करून पंधरा दिवसांनंतर ते घरी आले होते. त्यानंतर त्यांच्या मावस भावाला कोरोना झाला होता. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

भावांना डबा देण्यासाठी अमर मुंडे दवाखान्यात जात होते. यापूर्वीच अमर मुंडे यांना कोरोना झाला होता, त्यामुळे पुन्हा तुम्ही डबा द्यायला जाऊ नका, असे रेखाराणी अमर मुंडे यांना वारंवार सांगत होत्या. सोमवारी रात्री अमर मुंडे हे घरी आले. तेव्हा पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर रेखाराणी यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

Advertisement
Advertisement