Take a fresh look at your lifestyle.

संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर पार्सलच्या नावाखाली चढ्या भावाने दारुची अवैध विक्री

महाअपडेट टीम, 22 एप्रिल 2021 :- राहाता तालुक्यात शिर्डीसह परिसरात संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर परमिट रूम, बिअर बार, देशी दारु, वाईन्स या ठिकाणी पार्सलच्या नावाखाली वाढीव भावाने दारू विक्री होत आहे. त्यामुळे मद्य शौकीन कमी भावात दारू कुठे मिळते का? याचा शोध घेत आहेत. पोलीस प्रशासन लोक रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेत असताना दारूबंदी खात्याच्या आशीर्वादाने अनेक मद्यपी दारू पिऊन रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून येते.

Advertisement

कोरोना महामारीमुळे सामान्य अडचणीत आले असताना ज्यांच्या घरात रुग्ण आहेत ते लोक दवाखाना, औषधाच्या शोधात असताना, मद्यपी मात्र, स्वस्त दारु कशी व कुठे मिळेल याचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात.

Advertisement

एकीकडे पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरून मोठया प्रमाणात कारवाई करत असताना अजूनही काही दारू विक्रेते वाढीव भावाने दारू विक्री करत असताना त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. दारुमुळे भांडणाचे प्रसंग उभे राहतात, त्यातून गंभीर स्वरूपाच्या घटना देखील या अगोदर वेळोवेळी घडलेल्या आहेत.

Advertisement

या अनुभवातून पोलीस प्रशासनाने बोध घेण्याची गरज असताना या प्रकाराकडे दारूबंदी खाते व पोलीस प्रशासन गंभीरपणे बघत नसल्याची एकूण चित्र राहाता तालुक्यात दिसून येत आहे. दारूबंदी खात्याला या संपूर्ण प्रकरणाची बारीक-सारीक माहिती असताना केवळ आर्थिक हितसंबंध यामुळे याकडे दुर्लक्ष केले जाते,अशी चर्चा नागरिकांमध्ये असून या गंभीर प्रश्नात जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून कारवाई करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना कराव्या,अशी मागणी केली आहे.

Advertisement
Advertisement