Take a fresh look at your lifestyle.

Coronavirus In India Live Updates : भारताने जगातील सर्व रेकॉर्ड मोडले, देशात गेल्या 24 तासात 3 लाख 15 हजार नवे रुग्ण, मृतांचा आकडा 2000 च्या पुढे !

महाअपडेट टीम, 22 एप्रिल 2021 :- भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट अनियंत्रित झाली असून झपाट्यानं पसरत आहे. दररोज कोरोना नवीन रेकॉर्ड बनवत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे रुग्णालयांमध्ये कोरोना रूग्णांची संख्याही वाढत आहे. कोरोनाच्या या वाढत्या प्रकोपामुळे भारताने कोरोनाचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.

Advertisement

आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 24 तासात देशात तीन लाखांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली असून 2100 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. जगातील कोरोना रुग्णांची एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे. याआधी जगात एकाच दिवशी सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळण्याचा रेकॉर्ड अमेरिकेच्या नावावर होता. अमेरिकेत 8 जानेवारी 2021 रोजी 3,07,570 कोरोना रुग्ण आढळले होते.

Advertisement

गेल्या 24 तासात 3 लाख 15 हजार 478 नवीन रुग्ण आढळले आहेत. मागील 24 तासात 2101 जणांना जीव गमावला आहे. बुधवारी 1 लाख 79 हजार 372 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 84 हजार 672 जणांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 1 कोटी 59 लाख 24 हजार 732 इतकी झाली आहे. देशात सध्या 22 लाख 84 हजार 209 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे एकूण बाधितांच्या संख्येपैकी 14.3 टक्के आहेत.

Advertisement

महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह 11 राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर होत आहे. या राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 67,468 नवीन रुग्ण आढळले आहेत. 54,985 रुग्ण बरे झाले आहेत आणि 568 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 40.27 लाख लोक कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. यातील 32.68 लाख रुग्ण बरे झाले आहेत. तर, 61,911 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 6.95 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Advertisement
Advertisement