Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे आरोग्य आणीबाणी लागू करा : कपिल सिब्बल

महाअपडेट टीम, 19 एप्रिल 2021:- देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशात राष्ट्रीय आरोग्य आणीबाणी लागू करण्याची मागणी केली.

Advertisement

देशात रविवारी कोरोनाचे २,६१,५०० नवे रुग्ण आढळले. तर १,५०१ जणांचा बळी गेला. यामुळे रुग्णांचा आकडा वाढून १,४७,८८,१०९ वर तर बळींचा आकडा १,७७,१५० वर पोहोचला. देशात सध्या १८ लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत.

Advertisement

या पार्श्वभूमीवर कपिल सिब्बल यांनी पंतप्रधानांकडे देशात राष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित करण्याची मागणी केली. ‘देशात लोक बरे होण्याच्या तुलनेत कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने पसरत आहे. मोदींनी राष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित करावी. निवडणूक आयोगाने निवडणूक प्रचारसभांवर बंदी घालण्याची घोषणा करावी.

Advertisement

तर न्यायालयांनी लोकांच्या जीवनाचे संरक्षण करावे,’ असे सिब्बल रविवारी एका ट्विटद्वारे म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे देशात कोरोनाचा झपाट्याने संसर्ग होत असताना अनेक ठिकाणी कोरोनावर लाभदायी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनसह ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स व कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळेही स्थिती हाताबाहेर जाताना दिसून येत आहे.

Advertisement
Advertisement