Take a fresh look at your lifestyle.

उदयनराजेंना ‘भीक मांगो आंदोलना’तून जमा झालेल्या ४५० रुपयांच्या रोकडचं काय झालं ?

महाअपडेट टीम, 18 एप्रिल 2021 :- कोरोना महामारीत लॉकडाऊन नको, अशी मागणी करत खासदार उदयनराजे भोसले यांनी नऊ दिवसांपूर्वी साताऱ्यात ‘भीक मांगो आंदोलन’ केले होते. या आंदोलनातून भीक म्हणून जमा झालेली ४५० रुपयांची रोकड सरकारजमा करण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आणून दिली होती.

Advertisement

मात्र, ही रक्कम जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी शासनदरबारी जमा करून न घेता त्यांना साभार परत पाठवून दिली आहे. ही रक्कम त्यांनी मनिऑर्डरने उदयनराजेंच्या पत्त्यावर पाठवली आहे. दरम्यान, ही रक्कम आल्यानंतर उदयनराजे नेमकी काय भूमिका घेणार याकडेच आता नजरा लागून राहिल्या आहेत.

Advertisement

कोरोना महामारीत राज्य सरकारने अंशत: लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी संतप्त होत सातारा शहरात १० रोजी ‘भीक मांगो आंदोलन’ केले होते. साताऱ्यातील पोवई नाक्यावर एका आंब्याच्या झाडाखाली बसून त्यांनी सरकारला पैसे हवेत असल्याचा आरोप करत भीक मागितली. या वेळी त्यांच्या हाती असलेल्या कटोऱ्यात ४५० रुपये जमा झाले.

Advertisement

यानंतर त्यांनी पत्रकारांशी बातचित करत असताना त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आणि ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले. येथे आल्यानंतर ‘लॉकडाऊन मागे घ्यावाच लागेल, न घेतल्यास असंतोषाचा भडका उडेल व त्यास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील,’ असा इशाराही त्यांनी या वेळी दिला होता.

Advertisement

या वेळी त्यांनी जिल्हा प्रशासनावर टीका करतच जिल्हाधिकारी शेखर सिंग यांचाही त्यांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला होता. दरम्यान, उदयनराजेंनी जी ४५० रुपयांची रक्कम भीक म्हणून दिली होती; ती रक्कम जिल्हा प्रशासन शासन जमा करणार की कोषागार कार्यालयात ठेवणार याची उत्सुकता अनेकांना होती. मात्र, जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी उदयनराजेंनाच ती रक्कम साभार परत करण्याचा निर्णय घेतला.

Advertisement
Advertisement