Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra corona update : कोरोनाचा महाउद्रेक थांबता थांबेना, गेल्या 24 तासांत 67,123 नव्या रुग्णांची नोंद, तर मृतांचा आकडा 400 पार

महाअपडेट टीम, 18 एप्रिल 2021 :- महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णवाढीने उच्चांक गाठला. शनिवारी दिवसभरात विक्रमी ६७,१२३ नवे रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ३७ लाख ७० हजार ७०७ झाली आहे. या सोबतच तब्बल ४१९ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण बळींची संख्या ५९,९७० वर पोहोचली आहे. सध्या ६ लाख ४७ हजार ९३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापूर्वी १६ एप्रिल रोजी राज्यात ६३,७२९ रुग्ण आढळले होते.

Advertisement

दिवसभरात ५६,७८३ रुग्ण बरे झाल्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३० लाख ६१ हजार १७४ इतकी झाली आहे. राज्यात नोंद झालेल्या ४१९ बळींमध्ये मुंबई ५१, ठाणे ९, कल्याण-डोंबिवली १६, भिवंडी १, मीरा-भाईंदर १, वसई-विरार ४, पनवेल ३, नाशिक २७, अहमदनगर ५१, जळगाव २९, नंदुरबार १, पुणे ५४, पिंपरी चिंचवड १, सोलापूर १२, सातारा ७, कोल्हापूर ४, सांगली ५, सिंधुदुर्ग ५, जालना ६, हिंगोली १, परभणी ६, लातूर १२, उस्मानाबाद १२, बीड ६, नांदेड ३४, अकोला ६, अमरावती ९, यवतमाळ १३, बुलढाणा ९, वाशिम ३, वर्धा ५, भंडारा ३, चंद्रपूर १ आणि नागपूर येथील ३४ जणांचा समावेश आहे.

Advertisement

Advertisement

एकट्या मुंबई शहरातील बाधित रुग्णांची संख्या ५,७१,०१८ असून त्यापैकी ४ लाख ७१ हजार ०८० रुग्ण बरे झाले आहेत. तर येथील मृतांचा एकूण आकडा १२,३०१ इतका आहे. राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.१८ टक्के आहे.

Advertisement

तर राज्यातील मृत्यूदर १.५९ टक्के आहे. सध्या राज्यात ३५,७२,५८४ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून २५,६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आजपर्यंत २,३५,८०,९१३ नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Advertisement
Advertisement