Take a fresh look at your lifestyle.

Coronavirus in India live updates : खतरनाक झालीये दुसरी लाट, 24 तासांत विक्रमी 2,61,500 नवे रुग्ण, मृतांचा आकडा पाहून धडकी भरेल !

महाअपडेट टीम, 18 एप्रिल 2021 :- देशातील कोरोना महामारीची स्थिती दिवसेंदिवस आणखी भीषण होत चालली आहे. शनिवारी सकाळच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत देशात विक्रमी 2,61,500 नव्या रुग्णांची भर पडल्याने कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 1 कोटी 45 लाखांहून अधिक झाला आहे. 

Advertisement

तर आतापर्यंतच्या सर्वाधिक 1500 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. देशात आत्तापर्यंत नोंद झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 75 हजारांच्या पुढे गेला आहे. यासोबतच जागतिक पातळीवर कोरोना बळींचा आकडा 30 लाखांच्या पुढे गेला आहे.

Advertisement

परिस्थिती भयावह होत असून देशातील सर्व राज्यात लॉकडाऊन आणि कर्फ्यूसारकाही परिस्थिती लादली आहे. तसेच महाराष्ट्रासह, 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर, लस पूरक आहार आणि उपायांची मागणी देखील वाढली आहे. त्यामुळे सरकारचे सर्व प्रयत्न अपयशी ठरत चालले आहे.

Advertisement

Advertisement

सध्या देशात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून 16,79,740 इतकी झाली आहे. तर कोरोनामुक्त होण्याचा दर कमी होऊन 87.23 टक्के इतका झाला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या 1,26,71,220 च्या घरात आहे. मृत्यूदर घसरून 1..21 टक्क्यांवर आला आहे. देशात कोरोना रुग्णसंख्येने गतवर्षी 7 ऑगस्ट रोजी 20 लाखांचा टप्प्या ओलांडला होता.

Advertisement

यानंतर टप्प्या-टप्प्याने वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येने 19 डिसेंबर रोजी 1 कोटींचा आकडा गाठला होता. जगभरातदेखील कोरोना स्थिती पुन्हा गंभीर होत चालली आहे. ब्राझील आणि फ्रान्ससारख्या देशांमध्ये महामारीचे संकट गडद होत चाालल्याने लसीकरण मोहिमेमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.

Advertisement

जगभरात आतापर्यंत 14 कोटींहून अधिक जणांना कोरोना झाला आहे. यापैकी 11 कोटी 94 लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 30 लाखांहून अधिक जणांचा बळी गेला आहे.

Advertisement

महाराष्ट्रासह देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्याची परिस्थिती सर्वात वाईट आहे. सर्वाधिक महाराष्ट्रात विक्रमी 67,123 नवीन रुग्ण आढळली आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सलग दुसर्‍या दिवशी 27,334 हजारांहून अधिक रुग्ण आढळली. दिल्लीत 24,375 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि कर्नाटकात 17 हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळली आहेत. केरळमध्ये विक्रमी 13,835 नवीन रुग्ण आढळली आहेत.

Advertisement
Advertisement