Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Coronavirus Live Updates : संचारबंदी असूनही कोरोनाचा स्फोट ! गेल्या 24 तासात 63729 रुग्ण आढळले, मृतांचा आकडा धडकी भरवणारा !

महाअपडेट टीम, 17 एप्रिल 2021 :- महाराष्ट्रात कोरोना संक्रमणानं सगळ्यात मोठा ऍटॅक केल्याचं विदारक चित्र सद्य परिस्थितीवरून दिसून आलं आहे. परिस्थिती खूपच गंभीर होत असून सध्या नवीन केसेस ची झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या या वाढत्या फैलावाला आळा घालण्यासाठी सरकारकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु राज्यात कोरोना दररोज एक नवा उच्चांक गाठत आहे.

Advertisement

गेल्या 24 तासांचा आकडा धडकी भरवणारा असून राज्यात 63 हजार 729 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आत्तापर्यंत कधीच हा उच्चांक नोंदवला गेला नव्हता. राज्यातील वाढते करोना मृत्यू ही सुद्धा चिंतेची बाब बनली असून गेल्या 24 तासांत 389 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 37,03,584 वर गेली आहे. तसेच सक्रिय रुग्णांची संख्या 6,38,034 झाली आहे.

Advertisement

राज्यात गेल्या 24 तासांत 45,335 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आत्तापर्यंत एकूण 30,04,391 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.12 एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यू दर हा 1.61 % इतका झाला आहे. राज्यात 15 एप्रिलपर्यंत एकूण 1 काेटी 15 लाख 21 हजार 300 लाेकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Advertisement

राज्यात गेल्या 24 तासांत ठाणे मंडळात 17,635 रुग्णांचे निदान झाले आहे. पुणे मंडळात 13,891 रुग्णांचे निदान झाले आहे. तर नागपूर मंडळात 10,559 रुग्णांचे निदान झाले आहे.

Advertisement
Advertisement