Take a fresh look at your lifestyle.

हृदयद्रावक घटना : रात्री 11 नंतर पती – पत्नी मुलासह घराबाहेर पडले, कुंभी नदीजवळ जावून मुलाला घट्ट मिठीत घेतलं अन्…

महाअपडेट टीम, 16 एप्रिल 2021 :- पती पत्नीने आपल्या मुला मिठीत घेऊन कुंभी नदीत उडी मारून सामुहिक आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना कोल्हापुर जिल्ह्यातील पन्हाळा येथील गोठे गावात घडली आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांनतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनाला पाठवले होते.

Advertisement

घरातून गुरुवारी रात्री ११ नंतर हे दाम्पत्य बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली आहे. दीपक शंकर पाटील (४०), वैशाली दीपक पाटील (३५) आणि विघ्नेश अशी मृतांची नावे असून आत्महत्या करण्याआधी त्यांनी चिठ्ठी लिहिली होती. ‘यामध्ये जीवनात अयशस्वी झालो आहे. आत्महत्यास कोणालाही जबाबदार धरु नये. ‘वडिलांना आणि मुलीला सांभाळ करा’ अशा आशयाचे पत्र त्यांनी आपल्या मित्रांना लिहिले.

Advertisement

सविस्तर माहिती अशी की, गोठे गावात आईचे निधन झाल्याने वडील, पत्नी आणि दोन मुले यासह ते राहत होते. दीपक पाटील हे शेती व्यवसायाबरोबर पशूपालनही करत होते. मात्र, गुरुवारी रात्री 11 वाजता दीपक पाटील आपल्या पत्नी आणि मुलासह घराबाहेर पडले. त्यांनी गावाजवळ असलेल्या कुंभी नदीत पत्नी आणि आपल्या 13 वर्षाच्या मुलाला घट्ट मिठीत घेऊन उडी मारली.

Advertisement

सकाळी वडिलांना जाग आल्यानंतर घरात मुलगा, सून आणि नातू नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.त्यानंतर शोधाशोध केली असता सकाळी साडे नऊ वाजता तिघांचे मृतदेह कुंभी नदीच्या पात्रात तरंगताना दिसले.

Advertisement
Advertisement