Take a fresh look at your lifestyle.

Corona Update | राज्यात कोरोनाचा कहर सुरूच! आज 24 तासांत 58952 नवीन रुग्ण आढळले, तर 278 जणांनी जीव गमावला !

महाअपडेट टीम, 14 एप्रिल 2021 :- महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरु असून रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशातील र्वाधिक रुग्ण राज्यात आढळत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, जर लोकांना कोरोनाच्या नियमावलीचं पालन केलं नाही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु आजचीही रुग्णसंख्याही चिंतेत पडणारी आहे.

Advertisement

गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 58,952 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 278 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना मृत्यूचे प्रमाण 1.64 टक्के आहे. महाराष्ट्रातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 6,12,070 आहे. सध्या 34,55,206 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. , 28,494 लोक इंस्टीट्यूशनल क्वारंटीन आहेत.

Advertisement

Advertisement

महाराष्ट्रात आत्तापर्यंत 373 पोलिस कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला असून 10,304 पोलीस कर्मचारी होम क्वारंटीन आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या एकूण 36,728 जवानांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

Advertisement

आज मुंबईत कोरोनाचे आणखी नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाची 9925 नवीन प्रकरणे नोंदली गेली. त्याच वेळी, कोरोनामुळे 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात 995 इमारती सील केल्या आहेत.

Advertisement
Advertisement