Take a fresh look at your lifestyle.

शिक्षण क्षेत्राला धक्का, साताऱ्यात दहावीतील १३ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

महाअपडेट टीम, 14 एप्रिल 2021:- जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. गतवर्षीचा उच्चांक मोडून आज तब्बल १०९० कोरोनाग्रस्त आढळले. तसेच जावळी तालक्यातील सोनगाव (विद्यानगर) येथील श्री धुंदीबाबा विद्यालयातील ७२ पैकी तब्बल १३ विद्यार्थी बाधित सापडल्याने शिक्षण क्षेत्राला हादरा बसला आहे.

Advertisement

सध्या इयत्ता दहावीचे वर्ग सुरु असून, अनेक ठिकाणी दहावीतील विद्यार्थी बाधित आढळण्याचे प्रकार समोर येत आहेत. सोनगाव येथील धुंदीबाबा विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेणारे दरे गावातील २ जण विद्यार्थी बाधित आढळले होते.

Advertisement

दोन दिवसांपूर्वी ते बाधित आल्याने शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करण्याची मागणी सायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याकडे केली.

Advertisement

त्यानुसार ७२ विद्यार्थ्यांची तपासणी केली असता त्यातील ११ विद्यार्थी बाधित आढळले. त्यांच्यावर विलगीकरणात उपचार सुरु आहेत. २ शिक्षकांची तपासणी नकारात्मक आली आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्राला धक्का बसला आहे.

Advertisement
Advertisement