Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाचे रौद्ररूप ! ब्राझीललाही मागं टाकत भारत दुसऱ्या क्रमांकावर, गेल्या 24 तासात विक्रमी रुग्णवाढ, मृतांचा आकडा चिंताजनक !

महाअपडेट टीम, 13 एप्रिल 2021 :-  जगात कोरोना महामारीच्या वाढत्या संकटामुळे परत लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  भारत पुन्हा एकदा ब्राझीलला पाठी मागे टाकत करून अग्रस्थान च्या बाबतीत अमेरिकेनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे.

Advertisement

जागतिक पटलावर आता भारतात सर्वाधिक नवे रुग्ण सापडत असल्याने चिंता वाढली आहे.  गेल्या चोवीस तासांत देशात कोरोनाचे 1. कोटी 68 लाखांहून अधिक रुग्ण आढळल्याने कोरोना बाधितांचा आकडा 1 कोटी 35 लाख हून अधिक झाला आहे.  सध्या भारतात कोरोणाच्या दुसऱ्या लाटेने रौद्ररूप धारण केले आहे

Advertisement

गेल्या चोवीस तासात सापडलेल्या  1 कोटी 68 लाख नवे रुग्ण आढळल्याने देशातील कोरोना बाधितांची संख्या 1 कोटी 35 लाखांवून अधिक झाली आहे.  ब्राझीलमध्ये हा आकडा 1 कोटी 35 लाख इतका असून पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेत आतापर्यंत 3 कोटी 19 लाख कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. भारतातील सक्रिय रुग्णसंख्यादेखील प्रथमच 12 लाखांच्या पुढे गेली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली.

Advertisement

गेल्या 24 तासांत जगात सर्वाधिक मृत्यू ब्राझीलमध्ये झाले. रविवारी येथे कोरोनामुळे 1824 जणांचा मृत्यू झाला. यापाठोपाठ भारतात 904, रशियात 337 आणि इटलीमध्ये 331 जणांचे प्राण गेले.

Advertisement

18 ऑक्टोबर 2020 नंतर भारतात एक दिवसात इतके बळी जाण्याची ही पहिली वेळ असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. आरोग्य मंत्रालयानुसार देशातील दहा राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ नोंदविण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.

Advertisement
Advertisement