Take a fresh look at your lifestyle.

सावध ! ‘या’ ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका जास्त असतो आणि का ?

महाअपडेट टीम, 12 एप्रिल 2021:- आजकाल, खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे, बहुतेक सर्व लोकांना हृदयाशी संबंधित सर्वात जास्त आजार होत आहेत. परंतु आपल्या दुर्लक्षाशिवाय हार्ट अटॅकची इतरही अनेक कारणे असू शकतात आणि त्यापैकी एक म्हणजे आपला ब्लड ग्रुप. यावर वेळीच वैद्यकीय उपचार सुरू करणं गरजेचं आहे. अन्यथा हा आजार सायलेंट किलर ठरतो.

Advertisement

या ब्लड ग्रुपमधील व्यक्तींना हृदयविकाराचा धोका जास्त असतो : – ब्लड ग्रुप ‘A’ , ‘B’ आणि ‘AB’ या तीन ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका सर्वाधिक आहे. आंतरराष्ट्रीय संशोधनात, जेव्हा रक्तगटातील सर्व रूग्ण तसेच हार्ट अटॅकच्या रुग्णांची संख्या विचारात घेतली गेली तेव्हा असे आढळून आले की ब्लड ग्रुप ‘A’ , ‘B’ आणि ‘AB’ असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका सर्वात जास्त आढळून आला होता.

Advertisement

व्हिलाब्रँड फॅक्टर हा थ्रोम्बोटिक प्रक्रियेशी संबंधित रक्तचा गठ्ठा साचवणारे एक प्रोटीन आहे. ब्लड ग्रुप ‘A’ असलेल्या व्यक्तींमध्ये बहुधा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो.

Advertisement

ब्लड ग्रुप ‘A’ , ‘B’ आणि ‘AB’ असणा-यांना ‘O’ रक्तगटाच्या तुलनेत 9% ह्रदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. रक्तगट असलेल्या व्यक्तींना उच्च कोलेस्ट्रॉल असल्याचे म्हणतात, जे हृदयविकाराच्या झटक्याने मुख्य कारण आहे.

Advertisement

‘O’ रक्तगट सर्वोत्तम मानला जातो. या रक्तगटातील व्यक्तींना हृदयरोग होण्याचा धोका कमी असतो.

Advertisement

 

Advertisement
Advertisement