Take a fresh look at your lifestyle.

राज्यावर दुहेरी संकट, कोरोनासह अवकाळी तडाखा बसण्याची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा !

महाअपडेट टीम, 12 एप्रिल 2021 :-  राज्यात कोरोना महामारीने थैमान घातलेले असतानाच अवकाळीच्या तडाख्याचे नवे संकट उभे ठाकले आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची चेतावनी भारतीय हवामान विभागाने दिली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांना अलर्ट राहण्याचे आदेश जारी केले आहेत.

Advertisement

देशासह राज्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे राज्यात कोणत्याही क्षणी पुन्हा लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत राज्य शासन आहे. एकीकडे कोरोनाने शासन, प्रशासन, आरोग्य, यंत्रणेसह जनसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. यामध्ये आता अवकाळीच्या नव्या संकटाने तोंड बाहेर काढले आहे. भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा (मुंबई) वेधशाळेने राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची चेतावनी दिली आहे.

Advertisement

त्यानुसार रविवार दि. ११ ते बुधवार दि. १४ एप्रिल दरम्यानच्या कालावधीत ताशी ३० ते ४० कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊसही होण्याचा इशारा दिला.

Advertisement

विशेषत: मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी, जालना, लातूर, हिंगोली, नांदेड व उस्मानाबाद या जिल्ह्यांना अधिक फटका बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय राज्यातील विदर्भ, पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा बसण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Advertisement

त्यानसार जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कार्यालयांना तर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना विशेष आदेश जारी करून पर्जन्यवृष्टीतील आपत्तीचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्यासह अलर्ट राहण्याचे आदेश जारी केले आहेत.

Advertisement
Advertisement