Take a fresh look at your lifestyle.

Coronavirus In Maharashtra : महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी। आज ५२ हजार रुग्ण कोरोनामुक्त, तर रुग्णसंख्येत झालीये ‘इतकी’ घट !

महाअपडेट टीम, 12 एप्रिल 2021 :- राज्यात कोरोना संसर्गाने थैमान घातले असताना तसेच लॉकडाऊनचे सावट असताना एक दिलासादायक बातमी हाती आली आहे. गेल्या २४ तासांत नवीन बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा अधिक राहिला आहे. त्यामुळे राज्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. एकाच दिवशी तब्बल ५२ हजार ३१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Advertisement

तर नवीन बाधितांच्या संख्येतही आज घट झाल्याचं चित्र पाहावयास मिळालं आहे. आज दिवसभरात ५१ हजार ७५१ नवीन रुग्ण वाढले असून ५२ हजार ३१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दिवसभरात 258 जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. सध्या राज्यात 5 लाख 64 हजार 746 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Advertisement

एनआयच्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 34 लाख 58 हजार 996 वर पोहोचली आहे. त्यातील 28 लाख 34 हजार 473 जण पूर्णपणे बरे झाले असून 58 हजार 245 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Advertisement

राज्यातील एक्टिव्ह रुग्णांचा आकडा सहा लाखांच्या दिशेने सरकला आहे. आजच्या नोंदीनुसार सध्या एकूण ५ लाख ६४ हजार ७४६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील स्थिती चिंता वाढवणारी असून तिथे एक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १० हजार इतकी झाली आहे.

Advertisement

पुण्यानंतर मुंबई पालिका क्षेत्रात सध्या ८९ हजार १२५ एक्टिव्ह रुग्ण आहेत तर ठाणे जिल्ह्यात हा आकडा ७६ हजार ६८३ इतका झाला आहे. नागपूर जिल्ह्यात ५९ हजार ७५६, नाशिक जिल्ह्यात ३७ हजार ७६० तर औरंगाबाद जिल्ह्यात सध्या १५ हजार ५४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत आज नवीन ६ हजार ८९३ तर पुणे पालिका क्षेत्रात आज ५ हजार ३४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

Advertisement
Advertisement