Take a fresh look at your lifestyle.

Coronavirus Cases In India : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर ! गेल्या 24 तासात आढळले 1 लाख 69 हजार रुग्ण, तर मृतांचे आकडे धडकी भरवणारे

महाअपडेट टीम, 12 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या दुसर्या लाटेचा वेग मागील काही दिवसांपासून प्रचंड वेगाने वाढत आहे. दररोज कोरोनाचे एक लाखाहून अधिक नवीन रुग्ण आढळून येत असताना आता अशा परिस्थितीत कोरोनाची नवीन आकडेवारी समोर आली आहे,

Advertisement

त्यानुसार कोरोनाने आजपर्यंतची सर्व रेकॉर्ड्स मोडले आहेत. वर्ल्डमीटरने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 1,69,899 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून मृतांचे आकडे धडकी भरवणारे आहेत. गेल्या 24 तासात 904 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

मागील सलग 6 दिवसांपासून देशात कोरोनाचे एक लाखाहून अधिक नवीन रुग्णवाढ आढळली आहेत. त्याच वेळी, उपचारातून बरे होणार्‍या लोकांची संख्या कमी होत आहे. अशा परिस्थितीत, कोरोनाची ही दुसरी लाट आता बर्‍याच प्रमाणात विनाश करीत असल्याचं दिसून येत आहे.

Advertisement

कोरोनाची सर्वाधिक प्रकरणे डिसेंबर महिन्यात 97000 पेक्षा जास्त झाली आहेत. परंतु 2021 च्या एप्रिलमध्ये कोरोनाने प्रथमच 1 लाखांचा टप्पा ओलांडला. तेव्हापासून, कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे.मात्र, दिलासादायक बाब म्हणजे चाचण्यांची संख्या आणि लसीकरणाचा वेग वाढवल्यामुळे कोरोनासोबत लढा देण्यासाठी याचा फायदा होणार आहे.

Advertisement
Advertisement