Take a fresh look at your lifestyle.

Big breaking : पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरण : ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत !

महाअपडेट टीम, 10 एप्रिल 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मधील दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील अनेक गोष्टी बाहेर काढल्या होत्या. आरटीआयच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणले होते. त्यामुळे त्यांची हत्या झाले असावी असा अंदाज होता.

Advertisement

आता त्यांच्या हत्याप्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. पोलिस तपासाचा हवाला देत ही हत्या भूखंड प्रकरणातून झाली असून तो भूखंड ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कंपनीशी संबंधित असून या भूखंडासंबंधी तक्रारी करून अडथळा आणत असल्यानेच दातीर यांची हत्या झाल्याचा आला आहे.

Advertisement

त्यासंबंधीचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला आहे. कर्डिले यांच्या या आरोपांमुळे महाविकास आघाडीच्या सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणी येण्याची शक्यता आहे.

Advertisement

राहुरीचे माजी आमदार कर्डिले हे थोड्या वेळापूर्वी या यासंबंधी शनिवारी पोलिस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी या घटनेसंबंधी प्रसार माध्यमांशी बोलताना ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.

Advertisement

दातीर यांची हत्या झाल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून तनपुरे अद्यापही त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला गेले नाहीत. कारण त्यांना भीती आहे की भेटायला गेलो तर दातीर यांची पत्नी आपल्यावरच आरोप करेल.

Advertisement

त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा. राजकीय पाठबळ असल्याशिवाय एवढा गंभीर गुन्हा होऊ शकत नाही. यामध्ये खोट्या आरोपींना अटक न करता खऱ्या आरोपींना अटक करावी, अशी मागणी कर्डिले यांनी केली आहे.

Advertisement

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनाही आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याची विनंती करणार आहोत. येत्या पंधरा दिवसांत कारवाई झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी दिला आहे.

Advertisement
Advertisement