Take a fresh look at your lifestyle.

भयंकर ! खेळायला बाहेर गेलेली 5 वर्षीय चिमुकली अशा अवस्थेत घरी परतली की, वाचून तुम्हालाही धक्का बसेल !

महाअपडेट टीम, 10 एप्रिल 2021 :- दोन अल्पवयीन मुलांनी एका पाच वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना बिहारच्या सिवानमध्ये घडली आहे. सर्वात धक्कादायक बाब अशी की हे दोन्ही मुले अल्पवयीन असून यातील एकाचं वय 10 तर दुसऱ्याचं वय 11 वर्ष आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

ही घटना गेल्या आठवड्यात शनिवारी सायंकाळी घडल्याचं सांगण्यात येत आहे. जेव्हा ती मुलगी आणि इतर मुले परिसरात खेळत होती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास, दोन्ही अल्पवयीन आरोपी तिला खेळणीचे अमिष दाखवून जवळच्या झुडुपाजवळ घेऊन गेले,

Advertisement

जिथे त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. जेव्हा ती परत आली, तेव्हा ती रडत असल्याचं दिसून आलं. तिच्या कपड्यांना चिकटलेले रक्ताचे डाग दिसून आले. आणि तिच्या गुप्तांगातून रक्तस्राव येऊ लागला होता. हे सर्व पहिल्यांनंतर कुटुंबियांना धक्काच बसला. तातडीने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले त्यानंतर पोलिसांना कळविण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अकरा वर्षीय आरोपी हा सिवानचाच रहिवासी आहे, तर दहा वर्षाचा दुसरा आरोपी उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. तो आपल्या मामाकडे राहाण्यासाठी आला होता.

Advertisement

पीडित चिमुकलीच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केल्यानंतर अकरा वर्षाच्या आरोपीला त्याच्या घरच्यांनी दुसऱ्या शहरात शिफ्ट केलं. तर दुसऱ्या दहा वर्षीय आरोपीला त्याच्या नातेवाईकांनी उत्तर प्रदेशातील त्याच्या घरी पाठवलं.

Advertisement

या घटनेनंतर आरोपींचे सर्व पुरुष नातेवाईकही फरार झाले होते. अशात पोलिसांनी आरोपींच्या महिला नातेवाईकांना त्यांना हजर करण्यास सांगितलं होतं. पोलिसांनी कुटुंबीयांना कडक शब्दात इशाराही दिला.

Advertisement

यानंतर बुधवारी अकरा वर्षीय आरोपीला त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांसमोर हजर केलं. यानंतर त्याचं मेडिकल केलं गेलं आणि त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. पोलिसांनी चिमुकलीचे रक्तानं माखलेले कपडेही फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले आहेत.

Advertisement

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, की आम्ही दुसऱ्या आरोपीच्या नातेवाईकांनाही त्याला पोलिसांसमोर हजर करण्यास सांगितलं आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार आरोपींविरोधात कारवाई केली जाईल, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

Advertisement
Advertisement