Take a fresh look at your lifestyle.

लग्नाला मोक्कार गर्दी, नवरी-नवरदेवासह तब्बल तीनशे जणांवर गुन्हा दाखल

महाअपडेट टीम, 9 एप्रिल 2021 :- कोरोनामुळे विवाह समारंभावरील गर्दीवर मर्यादा आली असून केवळ ५० लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे. मात्र मांजरसुंबा (ता.बीड) येथे एका लॉन्समध्ये शेकडो जणांच्या उपस्थितीत विवाह पार पाडणे अंगलट आले.

Advertisement

याप्रकरणी नेकनूर ठाण्यात बुधवारी नवरदेव-नवरीसह तीनशे जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला. मांजरसुंबा येथील कन्हैय्या लॉन्स या ठिकाणी धारूर येथील अमित अर्जुन गायकवाड आणि पैठण (जि.औरंगाबाद) येथील ऋतुजा दीपकराव चव्हाण या दोघांचा विवाह सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी मोठी गर्दी दिसून आली.

Advertisement

यामुळे साथरोग, आपत्ती व्यवस्थापन आदी कलमाचे उल्लंघन झाल्याने ग्रामसेवक जगदीश कडू फिर्यादीवरून नवरदेव-नवरी त्यांचे आई-वडील, मामा, लग्न लावणारे पुरोहित, हॉटेल व्यवस्थापक यांच्यासह इतर तीनशे लोकांवर कलम नेकनूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, उपनिरीक्षक विलास जाधव यांनी केली.

Advertisement
Advertisement