Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक! लग्नाच्या दोन दिवस आधी बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला

महाअपडेट टीम, 9 एप्रिल 2021 :- शिक्रापूर (ता. शिरूर) येथून लग्नाच्या दोन दिवस आधी ३० मार्च रोजी बेपत्ता झालेल्या सागर अशोक ढमढेरे या ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यातील मिरज रेल्वे स्टेशनच्या रेल्वे रुळावर मिळून आल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

Advertisement

शिक्रापूर येथील सागर ढमढेरे याचे एक एप्रिल २०२१ रोजी लग्न होते. मात्र, सागर हा त्याचा भाऊ विशाल याच्या सोबत ३० मार्च रोजी गावातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये गेला होता.

Advertisement

त्यांनतर पुन्हा येत असताना त्याने त्याच्या भावाला चौकात सोडण्यास सांगितले, त्यानंतर बराच वेळ सागर घरी आला नाही त्यानंतर त्याचा मोबाईल देखील बंदच होता त्यामुळे सागरचा भाऊ विशाल अशोक ढमढेरे (रा. शिक्रापूर) यांनी पोलीस स्टेशन येथे भाऊ बेपत्ता झाल्याबाबत खबर दिली होती.

Advertisement

सागरचा मृतदेह रेल्वे रुळावर मिळून आला होता. त्याला मार लागलेला होता. मात्र, त्यावेळी त्याचा मोबाईल फुटला असल्याने कोणाशी संपर्क करता आला नव्हता. त्यामुळे तेथील पोलिसांनी त्याचा मोबाईल तांत्रिकरित्या तपासून या युवकाच्या मिळालेल्या माहिती नुसार शिक्रापूर पोलिसांशी संपर्क साधला त्यांनतर शिक्रापूर पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांसह मिरज जाऊन पाहणी केली

Advertisement
Advertisement