Take a fresh look at your lifestyle.

कोविड सेंटर उभारण्याची परवानगी तातडीने द्यावी; राजेश पाटील

महाअपडेट टीम, 9 एप्रिल 2021 :- पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या धडकी भरवणारी असून, त्यातील गंभीर रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे महापालिकेने सर्व कोविड केअर सेंटरमध्ये बेडचे नियोजन करून वाढविण्याची आवश्यकता आहे. त्याच बरोबर शहरातील खासगी हॉस्पिटल्समध्ये कोविड सेंटर करण्याची परवानगी तातडीने द्यावी,अशी मागणी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संदीप काटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Advertisement

संदीप काटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रत्यक्षात महापालिका प्रशासन आणि कोविड केअर सेंटरचे व्यवस्थापन कमी पडत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे कोविड हॉस्पिटलची परवानगी असणारे शहरातील खासगी रुग्णालयात ऑक्सिजन बेड कमी पडत आहेत.

Advertisement

पालिकेच्या कोरोना केअर सेंटर्समध्ये उपलब्ध ऑक्सिजन बेडचे योग्य व्यवस्थापन करण्यातही प्रशासन कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आयुक्तांंनी शहरातील सर्व खासगी रुग्णालयाना कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना उपचार करण्याची तातडीने परवानगी द्यावी. यामुळे महापालिकेचे प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत होईल.

Advertisement

तसेच महापालिका प्रशासनाने अण्णासाहेब मगर स्टेडियमवरील कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने सुरु करावे तसेच पालिकेच्या कोविड सेंटरवर ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत. सर्व खासगी रुग्णालयांचे कोविड रुग्ण संख्या, बेड संख्या, आईसीयु बेड यावर महापालिकेने नियंत्रण ठेवावेे. त्याचबरोबर वाढती लोकसंख्या विचारात घेऊन व राज्य सरकारचे घातलेले निर्बंध पाळण्याची हमी घेऊन शहरातील सर्व खासगी हॉस्पिटल यांना मागणीनुसार हॉस्पिटल करण्याची परवानगी द्यावी असे काटे यांनी म्हटले आहे.

Advertisement
Advertisement