Take a fresh look at your lifestyle.

थरारक! कामावरून घरी निघालेल्या पत्नीला भर रस्त्यात अडवून कोयत्याने केले वार

महाअपडेट टीम, 9 एप्रिल 2021 :- कामावरुन घरी जात असलेल्या पत्नीला भर रस्त्यात अडवून पतीने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने कोयत्याने वार केले. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. म्हाळुंगे येथे द्वारका सिटीकडे रस्त्यावर ही घटना घडली असून चाकण पोलिसांनी बुधवारी (दि.७) तिघांना अटक केली.

Advertisement

सुनीता कृष्णा दांडेल (वय २७, रा. घाटे वस्ती, आंबेठाण) असे जखमी पत्नीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कृष्णा राम दांडेल (वय ३४), काळू काशीराम माळसे (वय ३५), अमलेश्वर गुलचंद मस्के (वय ३५, तिघे रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) यांना अटक केली आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनिता दांडेल या इंडोरंस कंपनीत काम करतात. मंगळवारी रात्री कामावरून सुट्टी झाल्यानंतर त्या घरी जात होत्या. म्हाळुंगे कमानीजवळ रिक्षातून उतरून त्या द्वारकासिटीच्या रस्त्याने पायी जात असताना रात्री साडेसात वाजताच्या सुमरास आरोपी पती कृष्णा आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून त्यांचा रस्ता अडवला.

Advertisement

कृष्णा याने सुनीता यांचे तोंड दाबून त्यांना खाली पाडले. दोन्ही आरोपींनी सुनीता यांचे हात पकडले. त्यानंतर कृष्णा याने कोयत्याने सुनीता यांच्यावर वार केले. यामध्ये सुनिता यांच्या खांद्यावर, मानेवर, डोक्याच्या मागील बाजूला, दंडावर दुखापत झाली. चाकण पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Advertisement
Advertisement