Take a fresh look at your lifestyle.

अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर गुन्हा दाखल

महाअपडेट टीम, 9 एप्रिल 2021 :- पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यावरून हवेली पोलीस स्टेशन हद्दीत गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहिती वरून किरकटवाडी फाटा, श्रेयस हॉस्पिटल कॉर्नरलगत रस्त्याच्या कडेला अमर नामदेव शिंदे (वय २७, रा. कासार आंबोली कालभैरवनाथ मंदिरासमोर ता.मुळशी जि. पुणे) हा उभा असून त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन असून ते विक्री करण्यासाठी उभा असल्याचे समजले.

Advertisement

या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या एका विशिष्ठ पथकाने सापळा लावून ताब्यात घेतले असता त्याची अंगझडती घेतली. त्याच्या कमरेला एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. सदरच्या पिस्तूलाचे मॅगजिन चेक केले असता त्यामध्ये २ जिवंत काडतुसे मिळून आले.

Advertisement

 या व्यक्तीचे नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव अमर नामदेव शिंदे (वय २७, रा.कासार आंबोली काळभैरवनाथ मंदिरासमोर ता.मुळशी जि. पुणे) असे सांगितले. या आरोपीकडून मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तूल मॅगजीनसह : ३५,००० रुपये किमतीचे, दोन जिवंत काडतुसे २०० रुपये किमतीचे एकूण ३५,२०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Advertisement

आरोपी मुद्देमालासह पुढील तपासासाठी हवेली पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, पो. कॉ अमोल शेडगे, मंगेश भगत, पो.हवा. हनुमंत पासलकर, प्रमोद नवले, स.फौ. दत्ता जगताप, बाळासाहेब खडके, अक्षय जावळे यांनी केली आहे.

Advertisement
Advertisement