Take a fresh look at your lifestyle.

RBI चा मोठा निर्णय : आता तुम्ही Paytm – Phonepe मध्येही ठेऊ शकता 2 लाख रुपये, अन् RTGS-NEFT द्वारेही करू शकता फंड ट्रांसफर

महाअपडेट टीम, 8 एप्रिल 2021 :- भारतीय रिझर्व्ह बँकेने पेमेंट बँक खात्यातील दिवसअखेर शिल्लक (डिपॉझिट) मर्यादा दोन लाखांपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी एक लाख रुपयांची मर्यादा होती.

Advertisement

केंद्र सरकारने ठेवींवरील विमा संरक्षण पाच लाख रुपयांपर्यंत वाढवल्यानंतर पेमेंट बँकांनी खात्यातील शिल्लक मर्यादा वाढवण्याची मागणी केली होती. त्यावर आरबीआयने पतधोरण जाहीर करताना निर्णय घेतला. परवानाधारक पेमेंट बँकांसाठी २७ नोव्हेंबर २०१४ रोजी जारी केलेल्या नियमावलीनुसार वैयक्तिक कर्जदाराला त्याच्या बँक खात्यात एक लाख रुपयांची शिल्लक ठेवण्याची परवानगी होती.

Advertisement

मात्र पेमेंट बँकांच्या कामगिरीचा आढावा आणि ग्राहकांची गरज लक्षात घेत खात्यातील दैनंदिन शिलकीची मर्यादा एक लाखावरून दोन लाख रुपये करण्यात आली असल्याचे आरबीआयने जाहीर केले. पेटीएम पेमेंट बँक, एअरटेल पेमेंट बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक या आघाडीच्या पेमेंट बँका सध्या कार्यरत आहेत. या बँकांकडून बचत खाते सेवा दिली जाते. ज्यात ग्राहकाला पैसे जमा करण्याची सुविधा आहे.

Advertisement

मात्र पेमेंट बँकाकडून कर्ज दिली जात नाही. एटीएम/डेबिट कार्ड पेमेंट बँक इश्यू करतात, मात्र क्रेडिट कार्ड देत नाहीत. ज्या ठिकाणी बँकिंग सेवा पोहोचली नाही अशा ठिकाणी पेमेंट बँकांना सेवा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यात खात्यातील शिलकीची मर्यादा वाढवल्याने लाखो पेमेंट बँक खातेदारांना फायदा होणार आहे. त्यांना आता मोठ्या रकमेचे डिजिटल व्यवहार करणे शक्य होणार आहे.

Advertisement

नॉन-बँक पेमेंट सिस्टमला RTGS आणि NEFT ला जोडण्यास परवानगी :-  केंद्रीय बँक आरबीआयने नॉन-बँक पेमेंट सिस्टमसह केंद्रीय पेमेंट सिस्टम आरटीजीएस आणि एनईएफटीमध्ये सामील होण्यास मान्यता दिली आहे. आता फिन्टेक आणि पेमेंट कंपन्यांचे ग्राहक त्यांच्यामार्फत निधी हस्तांतरित करण्यास सक्षम असतील. पूर्वी ही सुविधा फक्त बँकांनाच आणि अपवादात्मकपणे काही इतर बिगर बँकांच्या ग्राहकांना उपलब्ध होती.

Advertisement

आरबीआयच्या या प्रस्तावामुळे पीपीआय, कार्ड नेटवर्क, वाइड लेव्हल एटीएम ऑपरेटर यासारखे नॉन-बँक पेमेंट सिस्टमदेखील मध्यवर्ती बँकेद्वारे संचालित आरटीजीएस आणि एनईएफटीची सदस्यता घेऊ शकतील.

Advertisement

आरटीजीएस (रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट) च्या माध्यमातून 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम कोणत्याही वेळी हस्तांतरित केली जाऊ शकते म्हणजेच 24 तास. त्याशिवाय एनईएफटी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) च्या माध्यमातून दोन लाखांपर्यंतचे निधी हस्तांतरित करता येतील.

Advertisement

 

Advertisement
Advertisement