Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Corona updates: चिंताजनक ! आज राज्यात 56,286 रुग्ण आढळले, मृतांचा आकडा धडकी भरवणारा…

महाअपडेट टीम, 8 एप्रिल 2021 :-  राज्यात आज नव्या करोना बाधित रुग्णांचा आकड्यात कालच्या तुलनेत घट झाली असली तरी आजची रुग्णवाढही चिंताजनक आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 56 हजार 286 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 376 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईत गेल्या 24 तासात 8,938 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि 23 जणांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

राज्यात आतापर्यंत 32 लाख 29 हजार 547 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 57 हजार 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल बुधवारी राज्यात कोरोनामध्ये 59 हजार 907 लोकांना संसर्ग झाला आणि 322 रुग्णांचा मृत्यू झाला.

Advertisement

गेल्या 24 तासांमध्ये एकूण 36 हजार 113 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या 30 हजार 296 इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 5 लाख 21 हजार 317 वर जाऊन पोहचली आहे.

Advertisement

सक्रिय रुग्णसंख्या :- राज्यातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख २१ हजार ३१७ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ९७ हजार २४२ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ८३ हजार ६९३ इतका आहे.

Advertisement

ठाणे जिल्ह्यात सध्या ६९ हजार ९९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ६१ हजार ७११ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३४ हजार ९१९ इतकी आहे.

Advertisement
Advertisement