Take a fresh look at your lifestyle.

राहुरीत पत्रकाराचे अपहरण करून निर्घृण हत्या, सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हात ?

महाअपडेट टीम, 7 एप्रिल 2021 :-  कायम बहुचर्चित असलेले राहुरी तालुक्यातील दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष व माहितीचा अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची अपहरणानंतर निर्घृण हत्या करण्यात आली आहे. काल दुपारी दातीर यांचे अपहरण झाले होते. रात्री उशिरा कॉलेज रोड परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Advertisement

सविस्तर माहिती अशी की, रोहिदास राधूजी दातीर हे राहुरी शहरातील मल्हारवाडी रोडने एम एच १२ जे एच ४०६३ नंबर च्या दुचाकीवरून काल दि. 7 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजे दरम्यान घरी जात होते.

Advertisement

सातपीर बाबा दर्गाजवळून जात असताना एका चार चाकी वाहनातून आलेल्या लोकांनी त्यांना मारहाण करून गाडीत बसविले आणि निघून गेले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तेथे धाव घेतली.

Advertisement

दातीर यांची दुचाकी आणि पायतील चप्पल घटनास्थळीच आढळून आली. दातीर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद होता. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध मोहीम हाती घेतली.

Advertisement

सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचा तपास लागला. पोलिसांनी ते ताब्यात घेतले. मात्र, आरोपी मिळाले नाहीत. आरोपी एका राजकीय पक्षाशी संबंधीत असल्याची माहिती पुढे आली आहे.

Advertisement

दातीर यांनी एका प्रकरणात माहिती आधिकार वापरून केलेल्या पाठपुराव्यामुळे अडचणीत आल्याच्या कारणातून त्यांनी ही हत्या केली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. रात्री राहुरी कॉलेज रोड परिसरात दातीर यांचा मृतदेह आढळून आला. त्यांना अमानुष मारहाण करून त्यांची हत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Advertisement
Advertisement