Take a fresh look at your lifestyle.

9 वी आणि 11वीचे विद्यार्थीही परीक्षेविना पास होणार का ? 10 वी, 12 वी च्या परीक्षांबाबत निर्णय काय ? तुम्हाला पडलेले प्रश्न वाचा ‘या’ लिंकवर

महाअपडेट टीम, 7 एप्रिल 2021 :- राज्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक असून मोठ्या प्रमाणावर धोका वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विना परीक्षा पास करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. पण आता आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट पास करण्यात येणार आहे. याबद्दल लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. असे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.

Advertisement

दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत काय होणार याबाबत अद्यापही विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम आहे. परंतु, या परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचं शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकात थोडासा बदल करायचा की नाही याबाबत येत्या एक – दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.

Advertisement

परंतु दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन नको अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी केली आहे आहे. पदवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन होतात किंवा 9 वी 11 वीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवण्याबाबतचा निर्णय होतो, मग 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांबाबत परीक्षा घेण्यावर सरकार ठाम का? असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

Advertisement

3 एप्रिल रोजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करून इ. 1 ली ते इ. 8 वी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन न करता सर्वांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्याचप्रमाणे इ. 9 वी आणि इ. 11 वीच्या विषयीसंबंधी निर्णय लवकरच घेण्यात येईल, असं संकेतही त्यावेळी गायकवाड यांनी दिले होते. त्यामुळे लवकरच हा निर्णय जाहीर केला जाणार आहे.

Advertisement
Advertisement