Take a fresh look at your lifestyle.

Coronavirus India Live Updates: गेल्या 24 तासात कोरोनाने सर्व विक्रम मोडले, 1 लाखांहुन अधिक रुग्ण आढळले, तर 630 रुग्णांनी जीव गमावला !

महाअपडेट टीम, 7 एप्रिल 2021 :- Coronavirus India Live Updates : भारतात कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रमाणांनं एक भयानक रूप धारण केले आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1 लाख 15 हजार 736 रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत भारतात सर्व विक्रम मोडलेले आहेत. धक्कादायक बाब अशी की, आरोग्य मंत्रायलयानं दिलेल्या माहितीनुसार मागील 24 तासांत 630 रुग्णांना कोरोनामुळं जीव गमवावा लागला आहे. तर, 59 856 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Advertisement

भारतात सर्वाधिक कोरोनाची प्रकरणे महाराष्ट्रातून येत आहेत. येथे एकाच दिवसात 56 हजार 469 नवीन रुग्ण आढळले, तर 297 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या कोविड-19 चे 4,72,283 रुग्ण उपचार घेत आहेत.

Advertisement

कोरोनामध्ये छत्तीसगडमध्ये 9,921 नवीन प्रकरणांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. गेल्या 24 तासांत भारतात 55 हजार सक्रिय घटनांमध्ये वाढ झाली आहे. एकूण सक्रिय प्रकरणांमध्ये महाराष्ट्र आणि छत्तीसगड हे दोन्ही राज्य पहिल्या दोन राज्यांमध्ये आहेत. महाराष्ट्रात 4.72 लाख,,तर छत्तीसगडमध्ये 52,445 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तिसरा नंबर कर्नाटकचा आहे, जेथे सक्रिय प्रकरणांची संख्या 45 हजाराहून अधिक आहे.

Advertisement

एक वेळ अशी होती, जेव्हा देशात कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय घट होण्यास सुरुवात झाली होती. 1 फेब्रुवारीला 8635 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. दिवसभरात आढळलेली ही सर्वात कमी रुग्णसंख्या होती. पण, आता मात्र चित्र काहीसं धास्तावणारं आहे. आतापर्यं देशात 25 कोटी 14 लाख लोकांचे सँपल चाचणीसाठी पाठवण्यात आल्याही माहिती समोर आली आहे.

Advertisement
Advertisement