Take a fresh look at your lifestyle.

सुपरस्टार थलापती विजय हा थेट सायकलवरून मतदानाला, ट्विटरवर पेट्रोल-डिझेल दरवाढ ट्रेन्डिंग, पहा व्हिडीओ

महाअपडेट टीम, 6 एप्रिल 2021 :-  तामिळनाडूमध्ये सोळाव्या विधानसभेसाठी आज मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून 88,000 बूथ मतदान केंद्रावर मतदान होत आहे. भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) कोविड -19 च्या रूग्णांना संध्याकाळी 6 ते 7 या दरम्यान मतदानाची परवानगी दिली आहे. या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजय हा थेट सायकलवरून आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विजयने आपल्या मतदानाचा हक्क चेन्नईतील निलनकेरी या ठिकाणी बजावला.

Advertisement

ग्रीन टी-शर्ट आणि मुखवटा घालून विजय मतदानात आला. विजय सायकलवर आला तेव्हा चाहतेही विजयसमवेत आल्याचं पाहायला मिळालं.पण त्याच्या या कृत्यामुळे ट्विटरवर वेगळीच चर्चा रंगली आहे. विजयच्या सायकलवरून येण्याने पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल दरवाढीची चर्चा रंगली आहे.

Advertisement

Advertisement

थलापती विजयच्या या सायकलवारीचा व्हिडीओ अवघ्या काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. विजयने गाडीतून न येता सायकरवारी का केली याच्याबद्दल अनेकांनी वेगवेगळे तर्क मांडायला सुरू केले.

Advertisement

पण विजयच्या सायकलवारीमागे देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये झालेली भरमसाठ वाढ हेच कारण असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं. ट्विटरवर तर अनेक दिवसांच्या नंतर पेट्रोल-डिझेल दरवाढ ट्रेन्ड होत आहे.

Advertisement

देशात गेल्या महिन्यापर्यंत सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत होती. जेव्हापासून आसाम, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पद्दुचेरीच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून या किंमती वाढायच्या कुठेतरी थांबल्याचं दिसून आलंय. मुंबई, दिल्लीसह अनेक शहरात या किंमती शंभरी गाठायच्या सीमेवर आहेत.

Advertisement
Advertisement