Take a fresh look at your lifestyle.

अखेर शनिमंदिरही दर्शनासाठी झाले बंद; गुढीपाडवा यात्रा व सप्ताह सोहळा रद्द

सोनई : राज्यात कोरोना संसर्गाची वाढलेली स्थिती लक्षात घेऊन शासनाच्या ‘ब्रेक द चैन’ आदेश म्हणून शनिशिंगणापूर येथील शनिमंदिर कालपासून दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली. 

Advertisement

याबाबत बानकर यांनी पत्रकात सांगितले, की राज्याबरोबरच जिल्हा आणि तालुक्यात रोजच कोरोना रुग्ण वाढत आहेत. हा गंभीर प्रश्न लक्षात घेवून देवस्थान विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत पदाधिकारी व पोलिस प्रशासनाने निर्णय घेवून काल पहाटे साडेचार वाजता आरती सोहळा झाल्यानंतर महाद्वार परीसरात सरंक्षण कठडे टाकून मंदिरात जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे.

Advertisement

कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून १३ एप्रिल रोजी असलेली गुढीपाडवा यात्रा, व उदासी महाराज पारायण सप्ताह रद्द करण्यात आला आहे. काल सकाळी नेहमीप्रमाणे गावातील सर्व पुजा साहित्य दुकाने व हॉटेल उघडले होते.

Advertisement

मंदीर बंद करण्यात आल्यानंतर अनेक व्यावसायिकांनी आपले दुकानही बंद केले. बाहेरून आलेल्या भाविकांनी महाद्वारात लावलेल्या स्क्रीनवर शनिदेवाचे दर्शन घेतले.

Advertisement
Advertisement