Take a fresh look at your lifestyle.

शिर्डीतील साईबाबा मंदिर ३० एप्रिलपर्यंत बंद, रवींद्र ठाकरे यांची माहिती

महाअपडेट टीम, 6 एप्रिल 2021 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्या ब्रेक दी चेन या धोरणांतर्गत साईबाबा मंदिर भाविकांना ५ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत दर्शनसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याकाळात मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम नेहमीप्रमाणे सुरु राहतील, अशी माहिती संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

Advertisement

ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की साईसंस्थानचे भक्तनिवास तसेच प्रसादालय व कॅन्टिन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रसादालयात केवळ रूग्णालय व कोविड सेंटरच्या रूग्णांसाठीच जेवण बनवले जाणार आहे. ५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासुन याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली. यावेळी मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, डॉ. मैथिली पितांबरे, मंदीर प्रमुख रमेश चौधरी, संरक्षण प्रमुख परदेशी तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थीत होते.

Advertisement

साई संस्थानच्या इतिहासात साथीचा संसर्ग रोखण्यासाठी तिसऱ्यांदा मंदिर बंद ठेवण्यात येत आहे. १९४१ मध्ये कॉलराचा संसर्ग रोखण्यासाठी मंदीर ऐन रामनवमीत बंद ठेवण्यात आले. तसेच शिर्डीत आलेल्या भक्तांना लस टोचण्यात आली. यानंतर कोरोनाचा संसर्ग सुरू होताच १७ मार्च २०२० रोजी दुपारी तीन वाजेपासून १५ नोव्हेंबर २०२० रात्री पर्यंत मंदीर बंद ठेवण्यात आले.

Advertisement

१६ नोव्हेंबरला मंदीर पुन्हा सुरू झाल्यानंतरही २३ फेब्रुवारी २०२१ पासुन दर्शनाच्या वेळा सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत कमी करण्यात आल्या. यामुळे पहाटेची व रात्रीची आरती भक्ताविना होऊ लागली.

Advertisement

त्यानंतरही कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन २८ मार्च २०२१ पासुन वेळेत आणखी कपात करून दर्शनाची वेळ सकाळी सव्वा सात ते रात्री पावणेआठ करण्यात आली. यानंतर सोमवारी रात्री आठ वाजेपासून शासनाच्या ब्रेक दि चेन धोरणानूसार पुन्हा मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Advertisement
Advertisement