Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : वानखेडे स्टेडियमवर IPLचे सामने होणार का ? महाराष्ट्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

महाअपडेट टीम, 5 एप्रिल 2021 :- आयपीएलचा १४वा हंगाम येत्या ९ एप्रिलपासून सुरू होत आहे. या स्पर्धेतील सर्व लढती देशातील सहा शहरात होणार आहेत. त्यापैकी एक मैदान मुंबईतील वानखेडे आहे. पण या मैदानावरील १० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली होती.

Advertisement

आयपीएल स्पर्धा जवळ आली असताना देशातील करोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशातील सर्वाधिक करोना रुग्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत आहेत. अशा स्थितीत वानखेडेवर आयपीएलचे सामने होतील का याबाबत शंका व्यक्त केली जात होती.

Advertisement

यासंदर्भात राज्य सरकार कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष्य होते. अखेर राज्य मंत्रिमंडळाने आयपीएलचे सामने मुंबईतील वानखेडे मैदानावर होण्यास हिरवा कंदील दिला आहे. कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी ही माहिती दिली. राज्य सरकारने एक दिवस आधी करोना संदर्भातील नवे नियम जाहीर केले आहेत.

Advertisement

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना मलिक म्हणाले, ही परवानगी अनेक अटींसह देण्यात आली आहे. मैदानावर प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. जे आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत त्यांना एका ठिकाणी आयसोलेशनमध्ये रहावे लागले. कोणत्याही परिस्थितीत गर्दी होता कामा नये या अटींवर परवानगी दिली आहे.

Advertisement

खेळाडूंना दिला जाणार लस :- बीसीसीआयच्या विनंतीनुसार खेळाडूंना देखील करोनाची लस दिली जाणार आहे, असे मलिक यांनी सांगितले. दरम्यान बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएल संदर्भात सर्व गोष्टी नियोजनानुसार होणार असल्याचे स्पष्ट केले. मुंबईतील वानखेडे मैदानावर १० ते २५ एप्रिल दरम्यान १० लढती होणार आहे. यातील पहिली लढत १० एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होईल.

Advertisement
Advertisement