Take a fresh look at your lifestyle.

Breaking : कोहलीच्या RCB ला मोठा धक्का, ‘हा’ धडाकेबाज फलंदाज कोरोना पॉझिटिव्ह

( IPL 2021) इंडियन प्रीमियर लीगचा 14 वा हंगाम 09 एप्रिलपासून सुरू होत आहे. आयपीएल 2021 चा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाईल. यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा धक्का बसला.

Advertisement

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. आता CSK, DC पाठोपाठ विराट कोहलीच्य़ा संघालाही कोरोनाचा फटका बसला आहे. काल शनिवारी दिल्ली कॅपिटलचा स्टार अष्टपैलू अक्षर पटेल देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. यानंतर, त्याला आइसोलेशन मध्ये पाठविण्यात होते. आता त्या पाठोपाठ देवदत्तही आइसोलेट झाला आहे.

Advertisement

कोरोनाच्या विळख्यात सापडल्य़ानं देवदत्त सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाही. त्यामुळे RCBसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सलामीवीर पडिक्कल असल्यानं कोहलीचं टेन्शन वाढलं आहे. नुकताच त्याने विजय हजारे ट्रॉफीच्या 7 सामन्यात 147 च्या सरासरीने 737 धावा केल्या आहेत.

Advertisement

दुसरीकडे कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. CSK मधील क्रिएटीव्ह टीममधील एकाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्समधील स्पिनर अक्षर पटेलला देखील कोरोनाची लागण झाली आहे. IPL 9 एप्रिलपासून सुरू होणार असून खेळाडूंना कोरोनाची लागण होत असल्यानं मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Advertisement