Take a fresh look at your lifestyle.

Coronavirus Updates : चिंतेत भर !, दिवसभरात आढळले तब्बल 93,249 नवे रुग्ण, तर 513 रुग्णांचा मृत्यू

महाअपडेट टीम, 4 एप्रिल 2021 :- कोरोना भारतात पुन्हा एकदा स्फोटक झाला आहे. नव्या वर्षातील सर्वांत मोठी रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला आहे. गेल्या २४ तासांत ९३ हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले असून त्याचबरोबर 24 तासांत 513 मृत्यू झाले आहेत. बर्‍याच राज्यात कोरोनाची नवीन प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. एकट्या महाराष्टात काल 49,000 पेक्षा जास्त केसेसची नोंद झाली, छत्तीसगडमध्ये कोरोना व्हायरसचे 5800 पेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले. देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचे 3500 हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत.

Advertisement

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोरोना विषाणू संसर्गासंदर्भातील आकेडवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार, संपूर्ण देशभरात गेल्या २४ तासांत ९३ हजार २४९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून, ६० हजार ०४८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, गेल्या २४ तासांत ५१३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. राज्यात तब्बल ४९ हजार ४४७ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर, ३७ हजार ८२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Advertisement

काल दिवसभरात २७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण ४,०१,१७२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८४.४९% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Advertisement

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 3 वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. दूरदृश्यप्रणालीद्वारे ही मिटिंग होणार आहे. आज रविवार असूनही मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावल्याने त्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यता येत आहे.

Advertisement

तसेच देशातील कोरोनाचे वाढते प्रकरण लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेत आहेत. या बैठकीत कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोनाच्या लसीकरण मोहिमेशी संबंधित मुद्द्यांचा आढावा घेतला जाईल. या बैठकीला कॅबिनेट सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव आणि डॉ. विनोद पॉल उपस्थित आहेत.

Advertisement
Advertisement