Take a fresh look at your lifestyle.

मोठा नक्षलवादी हल्ला : 24 तास उलटूनही घटनास्थळी रक्ताचे थारोळे, अन् मृतदेहांचा सडा, तब्बल 22 जवानांना वीरमरण !

महाअपडेट टीम, 4 एप्रिल 2021 :- छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमा भागात शनिवारी सुरक्षा दलातील आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीदरम्यान पाच सैनिकांना हौतात्म्य आलं होतं. त्यामध्ये 21 जवान हे बेपत्ता असल्याचं सांगण्यात आलं होतं. दरम्यान छत्तीसगड पोलिसांनी ‘एएनआय’च्या माहितीनुसार नक्षलवादी चकमकीत आणखी 14 जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अजून 7 जवानांचा शोध सुरु आहे.

Advertisement

मात्र, घटनास्थळी पडलेले मृतदेहांचे खच पाहून अनेकांच्या अंगाला शहारे आले. या चकमकीत पाच नव्हे तर तब्बल 21 जवानांना वीरमरण आलं आहे. या घटनेला तब्बल 24 तास उलटून गेले आहेत. मात्र, तरीही जवानांचे मृतदेह अद्याप त्याच ठिकाणी असून ते बाहेर काढण्यात आले नसल्याचंही समोर आलं आहे. घटनास्थळी रक्ताचे थारोळे, जवानांच्या मृतदेहांचा अक्षरशः सडा पडल्याचं चित्र आहे.

Advertisement

छत्तीसगडमधील बिजापूर येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत केवळ जवान शहीद झाले नाहीत. तर नक्षलवाद्यांना ठार करण्यातही यश आलं असल्याचं म्हटलं जात आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीवेळी घटनास्थळी 200 हून अधिक नक्षलवादी उपस्थित होते. सुरक्षा दलाचा असा दावा आहे, की या चकमकीत पंधराहून अधिक नक्षलवादी ठार झाले आहेत.

Advertisement
Advertisement