Take a fresh look at your lifestyle.

Akshay Kumar Tests Positive For COVID-19 : अक्षय कुमारला कोरोनाची लागण

महाअपडेट टीम, 4 एप्रिल 2021 :- संपूर्ण देश सध्या कोरोना व्हायरस विरूद्ध युद्ध लढा देत असताना बॉलिवूडमध्येही मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे. आता बातमी समोर आली आहे की बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारलाही कोरोनाची लागण झाली आहे. अक्षयने ट्विटरद्वारे ही बातमी शेअर केली आहे

Advertisement

त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे की, “आज सकाळी माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून मी आपणा सर्वांना सांगू इच्छित आहे.” यानंतर मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मी सध्या घरातच क्वारंटाईन आहे.

Advertisement

तसेच डॉक्टरांनी दिलेले सर्व उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्या. तसेच शक्य असल्यास कोरोना चाचणी करुन घ्यावी. Back in Action Very Soon,” असे ट्वीट अक्षय कुमार याने केले आहे.

Advertisement

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रेटी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आमिर खान, कार्तिक आर्यन, परेश रावल, आलिया भट्ट आर माधवन, नीतू सिंह, संजय लीला भन्साळी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, वरुण धवन यांसह अनेकांना यापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं होतं.

Advertisement

 

Advertisement
Advertisement