Take a fresh look at your lifestyle.

वाईट बातमी : छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यानंतर बेपत्ता झालेल्या 21 जवानांपैकी 14 शहिद, अजून 7 जणांचा शोध सुरु

महाअपडेट टीम, 4 एप्रिल 2021 :- छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमा भागात शनिवारी सुरक्षा दलातील आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीदरम्यान पाच सैनिकांना हौतात्म्य आलं होतं. त्यामध्ये 21 जवान हे बेपत्ता असल्याचं सांगण्यात आलं होतं. दरम्यान छत्तीसगड पोलिसांनी ‘एएनआय’च्या माहितीनुसार नक्षलवादी चकमकीत आणखी 14 जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अजून 7 जवानांचा शोध सुरु आहे.

Advertisement

काल शनिवारी सुरक्षा दल आणि पोलिसांची बिजापूरच्या तररेम जंगलात चकमक उडाली होती. तर्रेम, उसूर व पामेड आणि सुकमा जिल्ह्यातील मिनापा व नरसपुरम येथील कारवाईत सुमारे दोन हजार सैनिक सहभागी झाले होते तब्बल तीन तास याठिकाणी जोरदार धुमश्चक्री सुरु होती. यावेळी 21 जवान गायब झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी आज सकाळी पुन्हा सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते.

Advertisement

मात्र, आता 21 पैकी 14 जवान मृत्यूमुखी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित सात जवानांचा शोध अजूनही सुरु आहे. काल या चकमकीत 8 जवान शहीद झाले होते. तर 24 जवान जखमी झाले होते. यापैकी 7 जवानांची प्रकृती गंभीर आहे.

Advertisement

या घटनेनंतर डीजी सीआरपीएफ कुलदीप सिंग हे छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. घटनेची माहिती घेण्यासाठी ते छत्तीसगडला जाणार आहेत. गृहमंत्रालयाने डीजींना घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या घटनेत पाच जवान शहीद झाल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Advertisement
Advertisement