Take a fresh look at your lifestyle.

शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात डिस्चार्ज, सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले !

महाअपडेट टीम, 3 एप्रिल 2021 :- ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातुन अखेर चार दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. शनिवार (दि.3) सकाळी शरद पवार हे रुग्णालयातून ते त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत.

Advertisement

यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, कन्या सुप्रिया सुळे आणि जावई सदानंद सुळे उपस्थित होते. सध्या त्यांची प्रकृती ठणठणीत असून ते स्वतः गाडीतून उतरुन घरात गेले असल्याने पवार कुटुंबियांसह जनतेला सुखद धक्का दिला आहे.

Advertisement

त्यांच्या पोटात दुखत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर केलेल्या तपासणीमध्ये पित्ताशयाचा त्रास असल्याचे समोर आले होते. मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान, येत्या काही दिवसांत त्यांच्यावर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे.

Advertisement

डॉक्टरांनी पवारांना सात दिवस सक्तीने आराम करण्याचा सल्ला दिला असून या सात दिवसात पवारांच्या निवासस्थानी कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यासाठी बंगल्याभोवतीच्या सुरक्षेत वाढही करण्यात आली आहे. सात दिवस पवार घरीच आराम करणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

Advertisement
Advertisement