Take a fresh look at your lifestyle.

ह्दयद्रावक ! तब्बल ६ तास हॉस्पिटलचे उंबरठे झिजवले, पण कोणीही ऍडमिट केलं नाही, अखेर चिमुकल्याने रुग्णवाहिकेतच घेतला अखेरचा श्वास

महाअपडेट टीम, 3 एप्रिल 2021 :- दीड वर्षाचा मुलगा घराच्या चौथ्या मजल्यावरून अचानक खाली पडल्याने आईवडिलांनी त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेलं असता त्या ठिकाणी १० मिनिटे उपचार करून पुढील उपचारासाठी एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये जाण्याचा सल्ला दिला.

Advertisement

परंतु तब्बल 6 रुग्णालयाचे उंबरठे झिजवूनही बेड शिल्लक नाही म्हणून टाळाटाळ करत तब्बल ६ तास रुग्णवाहिका फिरवली पण अखेर रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन संपल्यानंतर मुलाने रुग्णवाहिकेतच अखेरचा श्वास घेतला. हा संतापजनक प्रकार दिल्लीतील मजनू का टिला च्या परिसरात घडला आहे. राजधानी दिल्लीच्या सरकारी हॉस्पिटलमधील एक भयंकर प्रकार समोर आल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Advertisement

जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेलं होतं. या रुग्णालयात १० मिनिटे डॉक्टरांच्या टीमने मुलावर उपचार केले आणि आईवडिलांनी पुढील उपचारासाठी एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये जाण्याचा सल्ला दिला. कारण या रुग्णालयात व्हेटिंलेटरचा अभाव आहे.

Advertisement

आई वडिलांनी रुग्णावाहिकेतून लहानग्या चिमुरड्याला घेऊन दिल्लीच्या सफदरजंग रूग्णालय गाठलं, येथील डॉक्टरांनी आईवडिलांना ताटकाळत ठेवत शेवटी याठिकाणी बेड उपलब्ध नसल्याचं सांगत एम्सला जावा, म्हटलं, मुलाच्या चिंतेत असणारे आईवडील पुन्हा मुलाला घेऊन एम्सला पोहचले. येथेही डॉक्टरांनी बेड उपलब्ध नसल्याचं सांगत एम्सच्या ट्रामा सेंटरला जाण्यास सांगितले.

Advertisement

ज्यावेळी आईवडील जखमी अवस्थेत मुलाला घेऊन ट्रामा सेंटरमध्ये पोहचले तेव्हा तिथेही बेड उपलब्ध नव्हता. त्यानंतर मुलाला घेऊन आरएमएल हॉस्पिटलला गेले, तेथेही डॉक्टरांनी सहकार्य न करता दुसऱ्या रुग्णालयात मुलाला घेऊन जाण्यास सांगितले.

Advertisement

त्यानंतर आईवडील मुलाला दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयात घेऊन आले, तेथे आयसीयू बेड नव्हता. दिल्लीच्या रस्त्यावर ६ तास भटकत असलेल्या आईवडिलांना एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये मुलाला पळवावं लागलं. अखेर रुग्णवाहिकेत ऑक्सिजन संपल्यानंतर मुलाने अखेरचा श्वास घेतला.

Advertisement
Advertisement