Take a fresh look at your lifestyle.

दिल्लीत कोरोनाची चौथी लाट आली असली तरी सध्या लॉकडाऊन लावणार नाही !

महाअपडेट टीम, 3 एप्रिल 2021 :- दिल्लीत कोरोनाची चौथी लाट सुरू असली तरी सरकारचा लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. ‘दिल्लीत कोरोना महामारीची चौथी लाट आली आहे. पण स्थिती नियंत्रणात असल्यामुळे सरकारने तूर्त लॉकडाऊनच्या मुद्यावर कोणताही विचार केला नाही,’ असे ते म्हणाले.

Advertisement

केजरीवाल यांनी शुक्रवारी एका उच्चस्तरीय बैठकीत दिल्लीतील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील स्थिती पूर्णत: नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले. ‘दिल्लीत कोरोनाची चौथी लाट सुरू आहे. पण बळींचा आकडा अत्यंत नगण्य आहे.

Advertisement

तसेच रुग्णांवर रुग्णालयात भरती करण्याची वेळही येत नाही. त्यामुळे स्थिती पूर्वीसारखी गंभीर बनली नाही. कोरोनाचे वाढते रुग्ण चिंतेची गोष्ट आहे. पण घाबरण्याची गरज नाही. सरकारची स्थितीवर करडी नजर असून आवश्यक ती सर्वच पाऊले उचलण्यात येत आहेत,’ असे ते म्हणाले.

Advertisement

यावेळी पत्रकारांनी त्यांना लॉकडाऊनविषयी छेडले असता त्यांनी सरकारने यावर अद्याप कोणताही विचार केला नसल्याचे स्पष्ट केले. मात्र भविष्यात गरज भासली तर त्यावर सखोल विचारविनिमयानंतर निर्णय घेतला जाईल,’ असे ते म्हणाले. ‘केंद्राने मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी ४५ वर्षांची अट शिथिल केली पाहिजे.

Advertisement

केंद्राने शाळांसारख्या बिगर आरोग्य केंद्रांवर लसीकरणाची परवानगी दिली तर युद्धपातळीवर लसीकरण होऊन कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यास मदत मिळेल,’ असेही केजरीवाल म्हणाले. यावेळी त्यांनी नागरिकांना मास्क घालण्याचे, सामाजिक अंतर पाळण्याचे व सातत्याने हात स्वच्छ करण्याचेही आवाहन केले.

Advertisement
Advertisement