Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक ! बकऱ्या शेतात गेल्याच्या रागातून बाप-लेकाने इतके मारले की, तरुणाचा जागीच मृत्यू झाला !

महाअपडेट टीम, 31 मार्च 2021 :- मोसंबीच्या शेतात बकऱ्या गेल्याच्या रागातून शेतमालक व त्याच्या मुलाने केलेल्या मारहाणीत शेळ्या चारणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. बदनापूर तालुक्यातील काजळा शिवारात सोमवारी (दि.२९) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी संशयित बाप-लेकास अटक केली आहे.

Advertisement

संजय पुंजाराम मांगडे (३५, रा. बुटेगाव, ता. बदनापूर) हा आपला मित्र संदीप सुदाम गवारे याच्या सोबत काजळा शिवारात शेळ्या चारताना संजय याच्या बकऱ्या विठ्ठल आप्पा गरड यांच्या मोसंबीच्या शेतात गेल्या. बकऱ्या शेतात आल्याचा राग आल्याने विठ्ठल गरड याने संजय व संदीप यांना शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण केली.

Advertisement

त्यानंतर विठ्ठल यांचा मुलगा बद्री उर्फ मन्नू गरड याने संजयच्या डोक्यात लोखंडी रॉड व छातीवर मोठा दगड मारल्याने रक्ताची उलटी झाल्याने तो जागीच गतप्राण झाला. बदनापूर ठाण्याचे सपोनि उबाळे व पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवला.

Advertisement

दरम्यान, या प्रकरणी मंगळवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास मृत संजय याचा भाऊ रमेश मांगडे यांच्या फिर्यादीवरून विठ्ठल गरड व बद्री गरड यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement
Advertisement